मुंबई : विद्यार्थ्यांना करियरच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. पण ते निवडताना, त्यासाठीचे क्षेत्र निवडताना आपल्याला आनंद मिळतो का? समाधान मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे. कारण कोणतेही करियर क्षेत्र श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. समाजासाठी डॉक्टर, अभियंता, वकील, पत्रकार, पोलीस, प्रशासक, लेखक अशी सर्वाची गरज असून यातील कोणताही घटक एकमेकांपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. तेव्हा हे लक्षात घ्या आणि आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करा, अशा शब्दांत विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) डॉ़ रवींद्र शिसवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत शनिवारी ते बोलत होते. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा असे सांगतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे करियरची उत्तम संधी उपलब्ध होत असून या क्षेत्राकडे का यावे, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा या सेवेत तुमची सुरुवातच उच्च पदापासून होते आणि कमी कलावधीतच एक एक पद पुढे जात सर्वोच्च पदापर्यंत जाता येते. त्यामुळे यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे यूपीएससी ही समान संधी देते. मग तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असा, अभियंता असा, डॉक्टर असा कोणीही ही परीक्षा देऊ शकते. तुमच्या गुणवत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा कस येथे लागतो. यावर तुमची निवड होते असेही ते म्हणाले.

mumbai heatwave alert marathi news,
मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
The election commission rejected the Thackeray group reconsideration petition regarding the campaign song
‘जय भवानी’वरील बंदी कायम; प्रचारगीताबाबत ठाकरे गटाची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Vande Bharat, Tejas Express,
पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार

विद्यार्थ्यांशी संवाद..

या कार्यशाळेत शनिवारी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी स्पर्धा आणि तणावाचे व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य अशा मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नव्याने उभारी घेतलेल्या समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमे या क्षेत्रातील संधी, त्याचा आवाका यांची ओळख केतन जोशी यांनी करून दिली. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षांच्या तयारीबाबत डॉ. श्रीराम गीत यांनी मार्गदर्शन केले. सायबर कायद्याबाबत युवराज नरवणकर यांनी मार्गदर्शन केले. करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी  कला, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह अनेक विद्याशाखांतील दहावी, बारावीनंतरच्या संधीचे विश्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले. जैवतंत्रज्ञान विषयातील संधींबाबत डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांनी मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा ठाण्यातही..

३ आणि ४ जूनला ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखे विषय असतील. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सवडीप्रमाणे नोंदणी करू शकतात. नोंदणी आणि तज्ज्ञ वक्त्यांविषयीची माहिती लवकरच देण्यात येईल.