मानखुर्द स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी सकाळी विस्कळीत झाली. सुदैवाने या दरम्यान एकही सेवा रद्द झाली नाही. मात्र ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक १५-२० मिनिटे उशिराने सुरू होती.हार्बर मार्गावर बुधवारी सकाळी ७.५० वाजता मानखुर्द स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडानंतर एक गाडी काही काळ मानखुर्द स्थानकातच रखडली होती. मात्र सकाळी ८.१०पर्यंत हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ा १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour line services disturbed
First published on: 27-11-2014 at 03:17 IST