कल्याण परिसरात पावसाची संततधार सुरू असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अंबरनाथ येथे पालिका रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यास कोंडी झाल्याने एक-ते-दीड फूट पाणी साचले आहे. तसेच या रस्त्याच्या आसपासच्या परिसरातील घरांमध्येही पाणी साचले आहे. मुसळधार पावसाचा फटका कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूकीलाही बसला आहे. पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली आहे.
याचा मध्यरेल्वेवर सध्यातरी कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु, अंबरनाथ पालिका रस्त्यावर पाणी साचल्याने पालिकेची निकृष्ट दर्जाची कामे उघड पडली आहेत.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संग्रहित छायाचित्र)