हेमा उपाध्याय आणि हरीश भांबानी या दुहेरी हत्याप्रकरणात मंगळवारी न्यायालयाकडून हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याशिवाय, याप्रकरणातील अन्य चार आरोपींना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. तत्पूर्वी आज सकाळी मुंबई पोलिसांनी हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक केली. सोमवारी रात्री चिंतन उपाध्यायला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीअंती पोलिसांनी चिंतन उपाध्यायला अटक केली. हेमा आणि हरीश भांबानी यांच्या हत्येपूर्वी मारेकरी विद्याधर राजभर आणि चिंतन उपाध्याय यांच्यात चर्चा झाली होती. त्यावरुनच महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी चिंतनला बेड्या ठोकल्या होत्या.

हेमा उपाध्याय यांची हत्या व्यावसायिक वादातू
याआधी सलग दोन दिवस चिंतन उपाध्यायची  चौकशी झाली होती. त्यानंतर या हत्याकांडात सहभागी असणाऱया चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश देखील आले. पण या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विद्याधर राजभर अजूनही मोकाट आहे. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग तसेच स्थानिक पोलिसांची विविध पथके राज्यात पाठविण्यात आली आहेत. चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करत असल्याने पती चिंतन उपाध्यायवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, ते या प्रकरणी संशयीत असल्याचे पोलिसांनी याआधी सांगितले होते. अखेर सोमवारी रात्री झालेल्या चौकशीअंती चिंतनलाही पोलिसांनी अटक केली आहे.
हेमा आणि त्यांच्या पतीमध्ये व्यावसायिक वाद सुरू होते. जुहूमधील घरात हेमा राहात होत्या तर त्यांचे पती दिल्लीत राहतात. तसेच हेमा आणि तिच्या पतीच्या घटस्फोटाच्या खटल्याचे काम भंबानी पाहात होते. कांदिवली परिसरातील डहाणूकरवाडी स्मशानभूमीजवळ उपाध्याय आणि भांबानी यांचे मृतदेह आढळून आले होते.

हेमा उपाध्याय हत्याकांड हे नेमके प्रकरण काय? –
* चित्रकार हेमा उपाध्याय यांची हत्या
* कोण होत्या हेमा उपाध्याय?
* कांदिवली दुहेरी हत्याकांड : चौथ्या आरोपीला अटक
* हेमा उपाध्याय हत्या प्रकरणी चौघांना पोलीस कोठडी
* फेसबुकवरील ‘अलविदा’ गाण्यामुळे चिंतन उपाध्याय अडचणीत?