मुंबई : सर्वसामान्यांच्या अर्जविनंत्यांवर निर्णय घेताना एरवी सरकारी यंत्रणांकडून वेळकाढूपणा, असंवेदनशीलता दाखवली जात असली तरी सरकारच्या या लालफितीच्या कारभारामुळे हतबल झालेल्या आणि आत्मदहन किं वा आत्महत्येचे इशारे देणाऱ्यांच्या पत्रांची दखल यापुढे तातडीने घेतली जाणार आहे. तीही आयुक्त, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून. किंबहुना अशा पत्रांची दखल कशी घ्यावी यासाठी सरकारच्या ‘कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागा’ने मार्गदर्शन करत ‘एसओपी’ (कार्यपद्धती) ठरवून दिली आहे, हे विशेष.

लहानसहान कामांसाठी अनेकदा विभागातील कार्यालयांचे खेटे घालून नागरिक थकून जातात. परिस्थितीने हतबल झालेले असे नागरिक त्या त्या विभागाच्या मुख्यालयासमोर किंवा थेट मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करतात. या प्रकारांमुळे सरकारचा अनागोंदी कारभारही चव्हाटय़ावर येतो. ही नाचक्की टाळण्यासाठी अशी आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळावी याची कार्यपद्धतीच कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना ठरवून दिली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
kirit somaiya sanjay raut
“हिसाब तो देना पडेगा”, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईनंतर सोमय्यांचा राऊतांना टोला
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

अनेकदा असे हतबल नागरिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी आत्मदहन किं वा आत्महत्या करण्याचे इशारे देणारे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना लिहितात. अशा पत्रांची दखल वेळीच घेण्यात यावी, अशी सूचना विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना के ली आहे. शक्यतो आयुक्त, साहाय्यक आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना वैयक्तिकरीत्या अशा पत्रांची दखल घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंत्रालयाकरिता ही प्रकरणे हाताळण्याकरिता सहसचिव वा उपसचिव हे नोडल अधिकारी म्हणून योग्य खबरदारी व उपाययोजना करतील. त्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत लेखी कळवायचे आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत.

कार्यपद्धती कोणती?

’ आत्मदहन, आत्महत्येच्या इशाऱ्याचे पत्र मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने काय करावे, याची तपशीलवार कार्यपद्धतीही ठरवून देण्यात आली आहे.

’  पत्र मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत संबंधित पोलीस ठाण्याला प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी लेखी कळवावे.

’ कार्यालयाच्या अवतीभोवती पोलीस बंदोबस्त ठेवावा.

’ ज्या कारणांकरिता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे, त्यांची शहानिशा करावी आणि त्यावर सरकारची बाजू पत्र लिहिणाऱ्यास लेखी कळवावी.

’ आवश्यकता असल्यास सुनावणी घेऊन ती पूर्ण करावी किंवा नियमात बसत नसल्यास लेखी पत्राद्वारे तसे कळवावे आणि आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करावे. ’ इतके  प्रयत्न करूनही पत्र लिहिणारा आत्महत्येच्या प्रयत्नांवर ठाम असेल, तर त्याच्याविरुद्ध पोलिसांकरवी प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि के लेल्या कार्यवाहीचा अहवाल सरकारला किं वा आयुक्त कार्यालयास कळवावा. गृह विभागालाही हा अहवाल पाठविण्यात यावा.