परदेशी पाहुणे मुंबईकर झाले; कामगारांकडून छोटेखानी कार्यक्रम

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात जुलै, २०१६मध्ये दाखल होऊन मुंबईकर झालेल्या हॅम्बोल्ट पेंग्विनना येथे येऊन वर्ष झाले आहे. येथील १८०० चौरस फुटांच्या नव्या आणि खास कक्षात हे परदेशी पाहुणे आता चांगलेच रूळले आहे. बुधवारी त्यांना मुंबईकर होऊन एक वर्ष झाल्याने उद्यानातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी छोटेखानी कार्यक्रमही आयोजित केला होता.

Arunachal Pradesh Manipur girls trafficked in Nagpur Ginger Mall in the name of spa crime news
‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

गेल्या वर्षी २६ जुलैला दक्षिण कोरियाच्या सेऊल येथून आठ पेंग्विनना मुंबईत आणण्यात आले. मुंबईत आल्यानंतर पहिले सहा महिने पेंग्विन २५० चौरस फुटांच्या तात्पुरत्या निवासात (क्वारंटाइन) राहत होते. त्यानंतर मार्च, २०१७ मध्ये त्यांना उद्यानातील मोठय़ा कक्षात हलविण्यात आले. तेथे त्यांना खेळण्यासाठी १८०० चौरस फुटांची जागा मिळाली आहे. पोहायला मोठी जागा मिळाल्यामुळे ते दिवसभर मनसोक्त खेळत असतात. खूप पोहतात. पोहण्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होत असल्याने भूकही खूप लागते.

नवीन प्रदर्शनीमध्ये आल्यापासून त्यांच्या आहारातही वाढ झाली आहे, असे पेंग्विनचा सांभाळ करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूच्या प्रमुख डॉ. मधुमिता काळे यांनी सांगितले. पहिले ७ ते ८ महिने हे पेंग्विन आमच्या जवळ येत नव्हते. मात्र आता चारही डॉक्टरांकडे पेंग्विन आपणहून येतात आणि त्यांच्याशी खूप मस्तीही करतात.

सहा महिन्यांपूर्वी या पेंग्विननी आपले साथीदारही निवडले. त्यांच्या डोनाल्ड-डेझी, ऑलिव्ह-पॉपाया, मिस्टर मोल्ट-फ्लिपर या तीन जोडया तयार झाल्या आहेत. यातील मिस्टर मोल्ट हा दोन वर्षांंचा पेंग्विन अतिशय खोडकर आहे.

त्यापेक्षा मोठी असलेली फ्लिपर मादी साडेतीन वर्षांची आहे. या पेंग्विनमध्ये आता बबल ही मादी पेंग्विनच साथीदाराशिवाय आहेत. मात्र ‘मिस्टर मोल्ट’ आणि ‘फ्लिपर’ ही पेंग्विनपासून येणाऱ्या नव्या बाल पेंग्विनमुळे बबल या पेंग्विनलाही सोबती मिळण्याची शक्यता आहे.

 

पेंग्विनसाठी माशांची साठवणूक

पावसाळ्यात समुद्रात मासेमारी बंद असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पेंग्विनना खाण्यासाठी माशांची साठवणूक करण्यात आली आहे. पेंग्विनना दिवसातून दोन वेळा सकाळी ८.३० आणि दुपारी ३.३० या वेळेस खाणे लागते. एका पेंग्विनला दिवसभरात १ किलो मासे दिले जातात. यात बोंबिल, तारली, रावस, मांदेली यांचा समावेश असतो.

खेळण्यासाठी घसरगुंडी..

जुन्या तात्पुरत्या निवासात आठ पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उरलेले सात पेंग्विन अनेक दिवस तणावाखाली होते. नव्या ठिकाणी वास्तव्यास आल्यानंतर मात्र ते चांगलेच रूळले. त्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी, चेंडू, लेझर दिवा, गोल रिंग दिले जातात. याशिवाय अनेकदा डॉक्टरांच्या अंगावर पाणी उडवून मज्जाही करतात. त्यांचे वजन फार वाढू नये याची काळजी घेतली जाते. त्यासाठी दर आठवडय़ाला त्यांचे वजन केले जाते आणि ते ४ किलोहून जास्त होऊ नये याची काळजी आम्ही घेतो, असे मधुमिता काळे यांनी सांगितले.