कोकणात गणपतीसाठी जाणा-या कोकण रेल्वेच्या गाड्या रेल्वे दलालांच्या बुकिंग सॉफ्टवेअर मुळे आज काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्यामुळे रात्रभर रेल्वे तिकीटासाठी रांगेत उभ्या असणा-या लाखो गणेशभक्तांना तिकीट मिळू शकले नाही, त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी आज रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. २९ ऑगस्ट रोजी गणेशचतुथी असून रेल्वेचे तिकिट बुकींग ६० दिवस आधी सुरु होते, कोकणात जाणा-या लाखो गणेशभक्तांनी कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी काल रात्रीपासूनच प्रत्येक रेल्वे स्थानकातील बुकिंग विंडो समोर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या परंतु आज प्रत्यक्ष बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या गणेशभक्ताला ३०० हुन अधिक वेटींग लिस्ट असलेले तिकीट मिळाल्यामुळे त्याची निराशा झाली व काही मिनिटीतच कोकण रेल्वेच्या सव गाड्या फुल्ल झाल्या. त्यामुळे कोकणात जाणारे लाखो प्रवासी आणि गणेशभक्तांना रेल्वेचे तिकीट मिळू शकले नाही, याप्रकाराची दखल घेत विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री गौडा यांच्याशी संपक करुन त्यांना तातडीने याप्रकाराची चौकशी करण्याची विनंती केली. तावडे यांनी दिलेल्या पत्रानुसार,रेल्वे तिकीट दलालांच्या रॅकेटमुळे तिकीट फुल्ल झाली आहेत. दलालांकडे असलेल्या एका विशिष्ट सॉफ्टवेअर ते आनलाईन तिकीट बुकिंग सुरु होण्यापूवी वापरतात त्यामुळे सवसमान्यांना तिकीट मिळत नाही, हा प्रकार गंभीर असून यासंदभात तातडीने चौकशी करण्याची मागणी करत कोकणवासीयांवर होणारा अन्याय दूर करण्याची विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे.