‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेंतर्गत नामांकित दागिन्यांच्या दुकानांमध्ये उपस्थिती

मुंबई : दिवाळीचा आनंदोत्सव सोन्याच्या खरेदीने साजरा करत असताना त्यावर बक्षिसे जिंकण्याची संधी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’च्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. या सोनेरी क्षणांचा गोडवा वाढविण्यासाठी खास धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनें’तर्गत सहभागी असलेल्या तीन ब्रॅण्ड्सना अभिनेत्री निशिगंधा वाड भेट देणार आहेत.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”

मराठी चित्रपटातील यशस्वी अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमधूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या भेटीचा आनंद ग्राहकांना ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’च्या माध्यमातून घेता येणार आहे. ५ नोव्हेंबपर्यंत सोने खरेदीचा हा जल्लोष सुरू राहणार आहे. दादर येथील लागू बंधू ज्वेलर्स, प्रभादेवीतील चिंतामणीज ज्वेलर्स आणि वरळीतील श्री नेमिनाथ ज्वेलर्स अशा तीन ठिकाणी मंगळवारी, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास निशिगंधा वाड भेट देणार आहेत.

सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन अशी आकर्षक बक्षिसे जिंका. या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

कधी? : २ नोव्हेंबर २०२१, सकाळी ११ वाजता

कुठे ? : लागू बंधू ज्वेलर्स- दादर

चिंतामणीज ज्वेलर्स- प्रभादेवी

श्री नेमिनाथ ज्वेलर्स- वरळी

प्रायोजक ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रुणवाल ग्रुप. प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स. गोल्ड पार्टनर श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कं पनी. सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज् ज्वेलर्स आहेत. आय के अर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे असून उषा एजन्सी गिफ्ट पार्टनर आहेत.