लूप मोबाइल ही कंपनी २९ नोव्हेंबर रोजी बंद होणार, असा संदेश आला आणि लाखो लूपधारकांची पोर्टिगसाठी धावपळ सुरू झाली. सहा ते सात दिवसांत पोर्टिग होईल या आशेवर असलेल्या ग्राहकाला दहा ते पंधरा दिवस वाट पाहूनही पोर्टिग प्रक्रिया सुरू झाल्याचा संदेश येत नाही. यामुळे लाखो ग्राहकांना मोबाइल क्रमांक सुरू राहील की नाही, अशी भीती वाटू लागली आहे.
एअरटेल आणि लूप या दोन कंपन्यांमधील करार रद्द झाला आणि लूप ग्राहकांच्या अडचणी वाढल्या. अनेकांनी दुसऱ्या कंपन्यांकडे धाव घेतली. यानुसार नवीन सेवा पुरविणाऱ्या कंपनीला पोर्टिग क्रमांक, आवश्यक कागदपत्रे पुरविण्यात आली. मात्र तरीही पोर्टिग होत नाही म्हणून चौकशी केल्यावर लूप कंपनीकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे ग्राहकांना सांगण्यात येते. थकीत बिलामुळेही पोर्टिगची अडचण निर्माण होते. पण अनेक गॅलरी बंद झाल्या आहेत.