आपल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून पित्याने मुलीच्या प्रियकराला केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. घोडबंदर परिसरात बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली आहे. घोडबंदर रोड परिसरातील पासवाडा येथे राहणाऱ्या विकास वळवी (२०) याचे त्याच परिसरातील अंकुश तळे (४०) यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या गोष्टीचा राग मनात धरून अंकुश तळे यांनी दोन साथीदारांच्या मदतीने मंगळवारी रात्री विकासला जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत विकासचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी विकासचा मृतदेह सापडल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी अंकुश तळे व प्रकाश दांडेकर यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारहाण करणारा तिसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2013 रोजी प्रकाशित
प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या
आपल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून पित्याने मुलीच्या प्रियकराला केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. घोडबंदर परिसरात बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली आहे.
First published on: 30-05-2013 at 03:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love affair cause youth murder in thane