राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाचे पाऊल

मुंबई : अथांग समुद्रात विहार करणाऱ्या ‘अरेबियन हम्पबॅक व्हेल’ या महाकाय माशाच्या संवर्धनासाठी राज्याच्या कांदळवन संरक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

How many applications filed under RTE only two days left to fill the application
आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (एमओईएफ) ‘प्रजाती पुनप्र्राप्ती प्रकल्पा’अंतर्गत यंदा हम्पबॅक  व्हेलच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कांदळवन विभागाने राज्याच्या सागरी परिक्षेत्रात आढळणाऱ्या हम्पबॅक व्हेलच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी मिळणाऱ्या निधीतून या सागरी जीवाचे स्थलांतर, अधिवासाचे ठिकाण, मासेमारीच्या पद्धतीचे परिणाम आणि त्यांच्या जीवशास्त्राचा अभ्यास केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात प्रथमच एखाद्या सागरी जीवाच्या संवर्धनासाठी सखोल अभ्यास केला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात अधिवास करणाऱ्या देवमाशांच्या प्रजातींवर फारसा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण लाभलेल्या आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जीवांच्या संवर्धनासाठी ‘एमओईएफ’कडून ‘प्रजाती पुनप्र्राप्ती प्रकल्प’ राबवला जात आहे. याअंतर्गत नष्ट होणाऱ्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रत्येक राज्याला निधी देण्यात येतो. जून महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीअंती हॅम्पबॅक व्हेलसह, नॉर्थन रिव्हर टॅरापिन (कासव), क्लाऊडेड  लेपर्ड आणि रेड पांडा या प्रजातींच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. तर हॅम्पबॅक  व्हेलच्या संवर्धनासाठी सागरी परिक्षेत्र लाभलेल्या राज्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आला.

हॅम्पबॅक व्हेल प्रजातीला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षण लाभले असून ओमानच्या किनाऱ्यापासून स्थलांतर करून हा मासा भारताच्या सागरी परिक्षेत्रात येतो. या प्रकल्पातील अभ्यासाद्वारे यांत्रिक बोटींचा हॅम्पबॅक व्हेलच्या स्थलांतरणाच्या पट्टय़ावर होणाऱ्या परिणामाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात या माशांच्या स्थलांतरणाच्या कालावधीत बोटींना सतर्कतेचा इशारा देण्यास मदत होईल, असे कांदळवन विभागाचे एन. वासुदेवन यांनी सांगितले. प्रजननादरम्यान साथीदार निवडण्यासाठी व्हेल मासे विशिष्ट ध्वनीद्वारे एकमेकांना साद घालतात. त्याची शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत ध्वनीविषयक  अभ्यास केला जाणार आहे.