महिलेवर बलात्कार करून तिची बदनामी केल्याप्रक रणी वाकोला पोलिसांनी एकाला अटक केली. नागेश कुचिकोवा असे या आरोपीचे नाव आहे. वाकोला येथे राहणारी अनुजा (नाव बदललेले)(४०) ही विवाहित महिला आणि आरोपी नागेश (४५) कांदिवली येथे एका कंपनीत काम करत होते. तेथे त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. परंतु नागेश तिला पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव आणत असल्याने ती त्याला टाळत होती. त्यामुळे संतापलेल्या नागेशने ५ जानेवारी रोजी तिचे अपहरण करून वाकोला येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर नागेशने अनुजाची बदनामीकारक पत्रके ती रहात असलेल्या परिसरात चिकटवली. हा प्रकार अनुजाच्या पतीला समजला. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर नागेशला गुरुवारी अटक करण्यात आली.