मराठवाडय़ाचा पाणीप्रश्न विधान परिषदेत मंगळवारी पेटला. जायकवाडी धरणासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी मराठवाडय़ातील आमदारांनी केली. मात्र ते शक्य नसल्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सांगितल्याने सभागृहात काही वेळ गोंधळ झाला. यासंदर्भात सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे जायकवाडीमध्ये अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी केली होती. जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद, नेवासा, पैठण आणि अनेक पाणीयोजनांसाठी महत्वाचा आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे पावसाळ्यापूर्वी समन्यायी वाटप करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.