मुंबईत फेब्रुवारीमध्ये आयोजन; फायबरच्या १०१ ‘गज’प्रतिकृतींचे प्रदर्शन

हत्ती हा जंगली प्राणी असला तरी माणसाचा भरवशाचा मित्र. मात्र आशियातील जंगलांमध्ये त्यांची संख्या गेल्या १०० वर्षांत ९० टक्क्य़ांनी कमी झाली असून हत्तींच्या अधिवासामध्ये मानवी अतिक्रमण झाले आहे. त्यातून निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘एलिफंट फॅमिली’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने मुंबईत फेब्रुवारी २०१८ मध्ये ‘भव्य हत्ती महोत्सव व प्रदर्शन’ आयोजित केला आहे. हत्तींच्या फायबर ग्लासच्या १०१ सुंदर प्रतिकृती मुंबईत सर्वत्र प्रदर्शित केल्या जातील. त्यांच्या लिलावातून उभारली जाणारी रक्कम भारतातील १०१ ‘ एलिफंट कॉरिडॉर’मध्ये अनेक उपाययोजना करण्यासाठी वापरली जाणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये झालेला हा महोत्सव भारतात व मुंबईत प्रथमच होत असल्याचे या महोत्सवाच्या सदिच्छा दूत, खासदार पूनम महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

या महोत्सवाची सुरुवात रॉटरडॅम येथे २००७ पासून झाली होती. हत्तींविषयी जनजागृती करून हत्तींच्या अधिवास आणि खाद्यान्नाचे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी आणि जंगलात झालेल्या मानवी वस्ती आणि अतिक्रमणातून हत्तींचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ‘एलिफंट फॅमिली’ ही संस्था जगातील अनेक देशांमध्ये कार्य करते. भारतात केरळ आणि आसाममध्ये हत्तींचा अधिवास संरक्षित करण्यासाठी संस्था कार्य करीत असून केरळमध्ये ३७ तर आसाममध्ये ४२ कुटुंबांचे जंगलातून अन्यत्र स्थलांतरही करण्यात आले आहे.

हत्तींच्या मदतीसाठी विविध प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेला सुमारे ४१ लाख अमेरिकन डॉलर्स इतका निधी उभारावा लागणार आहे. भारतात १०१ ‘एलिफंट कॉरिडॉर’ उभारून हत्तींचे अधिवास संरक्षित करावयाचे आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली. त्यासाठी भारतात प्रथमच हा  हत्ती महोत्सव व प्रदर्शन आयोजित केला असून त्यासाठी खासदार पूनम महाजन या ‘ब्रँड अँबेसिडर’ म्हणून काम पाहात आहेत.

अतिशय आगळ्यावेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणाऱ्या विलोभनीय हत्तींच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनातून मुंबईत फेब्रुवारीमध्ये हत्तींच्या संरक्षणाबाबत जनजागृती केली जाईल. तीन-चार आठवडे प्रदर्शन झाल्यावर या हत्तींच्या सुंदर प्रतिकृतींचा लिलाव करून त्या निधीचा विनियोग संस्थेच्या कार्यासाठी केला जाईल. या प्रतिकृतींची सरासरी किंमत सुमारे साडेचार लाख रुपयांपासून राहील. प्रतिकृतीसाठी सर्वाधिक बोली लंडनमध्ये २०१० मध्ये लावण्यात आली होती आणि एका प्रतिकृतीसाठी एक कोटी ७५ हजार रुपये लावली गेली होती. भारतात जयपूर, दिल्लीसह अन्य शहरांमध्येही या हत्ती महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे.