scorecardresearch

गायक मिका सिंगविरुद्ध महिलेची विनयभंगाची तक्रार

फॅशन डिझायनर असलेल्या या महिलेने मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

गायक मिका सिंगविरुद्ध महिलेची विनयभंगाची तक्रार
Mika singh : पोलिसांकडून मिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलीवूडमधील गायक मिका सिंग याच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. फॅशन डिझायनर असलेल्या या महिलेने मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांकडून मिकाविरुद्ध कलम ३५४, ३२३, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला मिका सिंगच्या घरी गेली असताना हा प्रकार घडला. यापूर्वीही मिका सिंग वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. २००६ साली स्वत:च्या वाढदिवसाच्या पार्टीत राखी सावंतचे चुंबन घेतल्याच्या आरोपावरून मिका चांगलाच चर्चेत आला होता. याशिवाय २०१४ साली हिट अॅड रन प्रकरणातही मिका सिंग अडकला होता. यानंतर २०१५ मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात डॉक्टराच्या कानशिलात लगावल्यामुळे मिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-07-2016 at 21:15 IST

संबंधित बातम्या