एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे आता जलवाहतूक बंद झाल्यामुळे अलिबागमधील प्रवाशांची दुहेरी कोंडी झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. खाजगी वाहने आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
   

अलिबागमधील एसटीच्या कामगार संघटनांनी आपली आडमूठी भुमिका अद्याप सोडलेली नाही. पगारवाढ मिळूनही अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान सुरु असणारी जलप्रवासी वाहतूक २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत जाणाऱ्या आणि अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे.
  

Fire Breaks Out, State Transport Bus, Gadchiroli, driver, conductor Prompt Action, Disaster, Prevent,
गडचिरोली : धावत्या बसने पेट घेतला; चालक व वाहकाचे प्रसंगावधान, प्रवासी…
pune marathi news, pune daund local train marathi news
पुणे-दौंड रेल्वे प्रवाशांची अडथळ्यांची शर्यत! रेल्वे प्रशासनाकडून निर्णय होईना
Thane Station, Passengers, Risk Lives, cutted Iron Barriers, Crossing railway Tracks, central railway,
ठाणे स्थानकात प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, श्रम टाळण्याबरोबच वेळेच्या बचतीसाठी रेल्वे रुळ ओलांडत लोखंडी अडथळ्यांमधून प्रवास
thane air conditioned trains cancelled marathi news, thane ac trains cancelled marathi news
ठाणे : सुट्ट्यांच्या दिवसांत वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या सेवा रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

मुंबई ते अलिबाग दरम्यान मांडवामार्गे जल प्रवासी वाहतूक केली जाते, यातून दररोज सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. शनिवार रविवार या दोन दिवसात या जलमार्गावरील प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचते, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी या मार्गाला प्रवाशांची पसंती मिळत असते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात या जलवाहतुकीचा मोठा आधार अलिबागकरांना होता. मात्र नौदल सप्ताहामुळे जलवाहतूक प्रवासी सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठीच अडचण झाली आहे.