मुंबई : गिरगावातील कोठारी हाऊस इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सुत्रांकडून कळते. 

गिरगावातील कोठारी हाऊस या चार मजली इमारतीला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याचे सुत्रांकडून कळते. ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत माहिती कळू शकलेली नाही.


सुत्रांच्या माहितीनुसार, गिरगावमधील कोठारी हाऊस या जुन्या चार मजली इमारतीच्या वरच्या तीन मजल्यांना रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी मोठी होती की, यामध्ये इमारतीचे वरचे तीन मजले जळून खाक झाले आहेत. या आगीची वर्दी मिळताच अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अग्निशामकच्या ८ गाड्यांसह अतिरिक्त पाण्याचे ८ टँकर तसेच हायड्रॉलिक गाड्या दाखल झाल्या. दरम्यान, या आगीत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai fire broke out at girgaons kothari house building at 1808 hours fire tenders have been rushed to the spot