मुंबईतील माझगाव कोर्टाचे छत कोसळल्याची घटना घडली. कोर्टरुममधील छताचा मोठा कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र या ठिकाणी सुनावणी सुरु नसल्याने मोठा अनर्थ टळला. कोर्टरुममधील छताच्या दुरवस्थेविषयी वारंवार चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र छताची दुरुस्ती करण्यात आली नाही. आता या प्रकरणी वकिलांच्या असोसिएशनने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.