सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत
मुंबई : पश्चिम उपनगरांतील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त के ले. या कारवाईत अटक करण्यात आलेली दलाल तरुणी सिनेसृष्टीशी संबंधित आहे. ती हिंदी, पंजाबी चित्रपट-मालिका क्षेत्रांतील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलत असल्याचे उघडकीस आल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने के ला.
अटक आरोपी २७ वर्षांची असून तिने हिंदी चित्रपटात अभिनय के ल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी तरुणी हिंदी, पंजाबी मालिका, तसेच चित्रपटांत अभिनय, नृत्य करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढते. शहरातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती दहिसर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांना मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करून गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्र वारी छापा घालण्यात आला. तेथे आरोपी तरुणीसह अन्य तीन तरुणी आढळल्या. या तीन तरुणींनी चित्रपटांमध्ये काम के ले आहे. या तिघींसाठी आरोपी तरुणी १० लाखांहून अधिक रक्कम आकारणार होती, असे सांगण्यात आले.