बहुतांश कंपन्यांची कार्यालये सुरू

गायत्री हसबनीस

mumbai heatwave alert marathi news,
मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
The election commission rejected the Thackeray group reconsideration petition regarding the campaign song
‘जय भवानी’वरील बंदी कायम; प्रचारगीताबाबत ठाकरे गटाची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Vande Bharat, Tejas Express,
पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार

मुंबई : कष्टकऱ्यांच्या चक्रात बारा महिने चोवीस तास धडधडणाऱ्या मुंबईची कार्यसंस्कृती दीड वर्षांपूर्वी करोनाने रोखली. वेगवेगळ्या काळातील निर्बंध, प्रवास अडचणी आणि भवतालातील विषाणूच्या धास्तीने कोलमडलेल्या जगामुळे थांबलेले कंपन्यांचे गाडे या आठवडय़ापासून पूर्ववत होणार आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बहुतेक खासगी, निमशासकीय आस्थापनांनी आपली कार्यालयीन घडी करोनापूर्वकाळासारखी बसविण्यास सुरुवात केली आहे.

बहुतांश कंपन्यांनी दिवाळीनंतर याबाबत ठोस पावले उचलली असून लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांची घरून काम करण्याची मुभा रद्द करण्यात आली आहे. कार्यालयीन वातावरणातील शिस्त आणि प्रभाव कर्मचाऱ्यांमध्ये पूर्ववत करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत. अनेक कंपन्यांनी नव्याने नियुक्त्यांचा आराखडाही तयार केला आहे.

करोना संपुष्टात आला नसला, तरी योग्य ती काळजी घेऊन सुरक्षित वातावरणात पूर्वीसारखीच कार्यालयांतील गजबज पुन्हा परत आणण्यासाठी कंपनीचालक उत्सुक दिसत आहेत. अनेक खासगी कार्यालये, बँका यांनी सोमवारपासून (१५ नोव्हेंबर) लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयातील हजेरी बंधनकारक केली आहे. त्यामुळे हा आठवडा अनेकांसाठी घरातील चार भिंतींपलीकडल्या कार्यअनुभवाचा ठरणार आहे.

सर्वेक्षण काय सांगते?

नॅसकॉम या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या संघटनेने गेल्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार कर्मचारी आणि कंपन्यांच्या प्रशासनाची घरातून काम आणि कार्यालयातून काम अशा संमिश्र कार्यपद्धतीला पसंती असल्याचे दिसते. साधारण ७० टक्के कंपन्यांनी संमिश्र कार्यपद्धतीला पसंती दिली असून हजारपेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्या या पद्धतीचा विचार करत आहेत. मात्र त्याच वेळी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याची उत्सुकता आहे. पंचवीस वर्षांखालील आणि ४० वर्षांवरील कर्मचारी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून काम करण्यास इच्छुक आहेत.            

मुंबईची कार्यसंस्कृती पूर्वपदाकडे प्रवासातील अडचण

लसीकरण झाल्यानंतरही अनेकांसाठी प्रवास अजूनही सुकर झालेला नाही. कामाच्या अपुऱ्या वेळा, सगळेच अचानक सुरू झाल्याने कार्यालयीन बैठकांमध्ये वाढ झाली आहे. दोन वर्षांत बदललेल्या सवयी, वेळापत्रक यानंतर आता नव्याने कार्यालयातील हजेरी, वैयक्तिक वेळ या सगळ्याचा तोल साधण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. कर्मचाऱ्यांची सोय बघून वेळापत्रक आखण्यासाठी सध्या कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही सगळे सुरळीत जुळून येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे, असे वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दीड वर्षांने कार्यालयातून काम सुरू झाल्यानंतर कामाच्या वेळा बदलल्या आहेत. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकारी एकाच वेळी उपस्थित असल्याने त्यांच्याशी अधिक जुळवून घ्यावे लागत आहे. व्यवस्थापनाची एकूण रचना बदलल्याने नव्या कार्यपद्धतीनुसार कामाशी जुळवून घ्यावे लागत आहे. 

किरण जंगम, कॉपीरायटर

सारे ऑफलाइन करण्यावर भर..

टाळेबंदीच्या कालावधीत अनेक उत्पादने, सेवांच्या व्यवसायावर परिणाम झाला असला तरी कंपन्यांनी महसूल वाढीच्या इतर संधी शोधल्या. त्यामुळे कामाचा विस्तार वाढू लागला. त्यामुळे आता महत्त्वाच्या बैठका ऑनलाइन करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून कार्यालयात घेण्याचा निर्णय कंपन्यांच्या प्रशासनाने घेतला आहे.

सहयोगाची आवश्यकता..

करार किंवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा मुक्त म्हणजेच स्वतंत्ररीत्या काम करणारा कर्मचारी वर्ग वाढणार आहे त्याचबरोबर पूर्वी जसे सहकार्य पद्धतीने म्हणजेच टीम वर्कने कामकाज होत होते ते आता सहयोगाने म्हणजे जोडीने कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे, अशी माहिती व्यवसाय सल्लागार राजू खोतवाड यांनी दिली.

आमच्या कार्यालयातील बऱ्याच जणांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी प्रवास करून ऑफिसला येणे हे अनेकांसाठी अजूनही कठीण आहे. कर्मचाऱ्यांचा विनाकारण प्रवास टळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

–  सतीश खुबचंदानी, संस्थापक, संचालक, देविका हायके अर

परत कार्यालये सुरू झाली तरी सामाजिक संवाद, पोषक आहार आणि प्रतिकारशक्ती वाढवणे या तीन गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. घरून काम करत असताना कर्मचाऱ्यांचा परस्पर संवाद कमी झाला आहे. या सर्व गोष्टी कार्यालयात नव्याने रुजवाव्या लागणार आहेत.  

डॉ. रमा मराठे, समुपदेशक