शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नाना आंबोले यांनी बाजी मारत काँग्रेसच्या गीता यादव यांचा चार मतांनी पराभव केला. एकूण १४ सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी नाना आंबोले यांना ९ मते पडली तर गीता यादव यांना ५ मते मिळाली. मनसे आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निवडणुकीत भाग न घेता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. आंबोले हे प्रभाग क्र. १९८ मधून निवडून आले आहेत. यापूर्वी अनेक समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. अर्थिक संकटात असणाऱ्या बेस्ट उपक्रमाला सावरण्याचे मोठे आव्हान आंबोले यांच्यासमोर असणार आहे.