मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या प्राकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे शुक्रवारी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुल्र्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांना ३ मार्चपर्यंत सक्तवसुली संचलनालय (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने त्यांना बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात नेले. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारीला सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते0. नवाब मलिक यांची प्रकृती खाल्यावल्यामुळे त्यांना दुपारी २.३०च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. कुर्ला येथील ३०० कोटी रुपये किमतीची जमीन बळकावल्याप्रकरणी सध्या ईडी तपास करीत आहे. हसीना पारकरच्या हस्तकांनी ही जागा बळकावली होती. त्याप्रकरणी मनी लाँडिरग झाल्याचा ईडीला संशय आहे. या जमिनीची किंमत विक्रीखतानुसार तीन कोटी ३० लाख रुपये होती. त्यातील केवळ १५ लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आल्याचा आरोप आहे. नवाब मलिक यांच्या मुलाला समन्स नवाब मलिक यांचे पुत्र फराझ मलिक यांना ईडीने समन्स बजावले होते. पण ते आज ईडी कार्यालयात आले नसल्याचे सूत्रानी सांगितले. या प्रकरणातील व्यवहारांचे व कंपनी संबंधित कागदपत्रांसह त्यांना बोलवण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मलिक यांच्याकडून वेळ मागण्यात येणार असल्याचे मालिक कुटुंबीयांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले.