एनसीबीची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर चार कोटींचे हेरॉईन जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली. विमानतळ परिसरात करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत आलेल्या एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून कथित ७०० ग्रॅम व्हाईट पावडर जप्त केली, हे हेरॉईन असल्याची माहिती आहे. ज्याची किंमत ४ कोटी रुपये आहे. याबाबत एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू आहे, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. 

एनसीबीने मंगळवारी (२ नोव्हेंबर) देखील विलेपार्के परिसरात मोठी कारवाई केली होती. एनसीबीने करोडो रुपयांचे हेरॉईन जप्त केले. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त करण्याच्या या कारवाईची माहिती एनसीबीने दिली आहे. या प्रकरणातील संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी अद्याप तपास सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncb major action heroin worth rs 4 crore seized at mumbai airport srk

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या