शिवसेना आणि भाजपची २५ वर्षांंची युती तुटताच अवघ्या तासाभरात राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर काडीमोड घेत १५ वर्षांंची आघाडी संपुष्टात आणली. आघाडी तोडताना राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात गेले असून, राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करू शकतात, असे कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्याची राष्ट्रवादीचे नेते वाटच बघत होते. भाजपने युती तुटल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादीनेही फारकत घेतली. आम्ही आघाडी वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात राष्ट्रवादीने दावा केलेल्या काही मतदारसंघांचा समावेश होता. आघाडीसाठी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आघाडीसाठी आम्ही पुढाकार घेतला होता. पण काँग्रेसकडून काहीच गांभीर्याने घेण्यात आले नाही, असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. काँग्रेसचे दिल्लीतील नेते वा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीसाठी उत्सुक दिसत नव्हते. यामुळेच आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने चारच दिवसांपूर्वी उस्मानाबाद आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवले. आम्ही मात्र सर्वत्र काँग्रेसशी आघाडी केली, असे अजित पवार यांनी सांगितले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात काही अडचणी निर्माण झाल्यास मार्ग काढला जाई, पण आता तसे प्रयत्न झाले नाहीत, असे सांगत अजितदादांनी आघाडी तुटण्याचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ढकलले.  आघाडी तुटली तरी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतांचे विभाजन टाळण्याकरिता राष्ट्रवादी समविचारी पक्षांशी आघाडी करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना आणि भाजपची २५ वर्षांंची युती तुटताच अवघ्या तासाभरात राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर काडीमोड घेत १५ वर्षांंची आघाडी संपुष्टात आणली. आघाडी तोडताना राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात गेले असून, राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करू शकतात, असे कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्याची राष्ट्रवादीचे नेते वाटच बघत होते. भाजपने युती तुटल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादीनेही फारकत घेतली. आम्ही आघाडी वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात राष्ट्रवादीने दावा केलेल्या काही मतदारसंघांचा समावेश होता. आघाडीसाठी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आघाडीसाठी आम्ही पुढाकार घेतला होता. पण काँग्रेसकडून काहीच गांभीर्याने घेण्यात आले नाही, असा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. काँग्रेसचे दिल्लीतील नेते वा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीसाठी उत्सुक दिसत नव्हते. यामुळेच आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने चारच दिवसांपूर्वी उस्मानाबाद आणि कोल्हापूर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवले. आम्ही मात्र सर्वत्र काँग्रेसशी आघाडी केली, असे अजित पवार यांनी सांगितले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात काही अडचणी निर्माण झाल्यास मार्ग काढला जाई, पण आता तसे प्रयत्न झाले नाहीत, असे सांगत अजितदादांनी आघाडी तुटण्याचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ढकलले.  आघाडी तुटली तरी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतांचे विभाजन टाळण्याकरिता राष्ट्रवादी समविचारी पक्षांशी आघाडी करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले.