११३ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाची नोटीस

मुंबई : ऑनलाइन अ‍ॅप किंवा संकेतस्थळांच्या माध्यमातून घरपोच खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या स्विगी, फुडपांडा, झोमॅटो, उबरइट या कंपन्या परवाना नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या संकेतस्थळांना खाद्यपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मुंबईतील ११३ खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

ऑनलाइन कंपन्यांना खाद्यपुरवठा करणारे विक्रते खाद्यपदार्थाची निर्मिती कशी करतात, त्यासाठी त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत का याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान केली. या काळात ३४७ विक्रेत्यांच्या दुकांनाची तपासणी केली. यापैकी ११३ खाद्यविक्रेते बेकायदा आणि अस्वच्छ वातावरणामध्ये खाद्यपदार्थनिर्मिती करीत असल्याचे आढळले. हे विक्रेते स्विगी, फुडपांडा, झोमॅटो, उबरइट या कंपन्यांना खाद्यपदार्थ पुरवीत होते. या विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा मानद कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांना दुकाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे. बेकायदा खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घेऊन त्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनाही या प्रकरणात दोषी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले.

११३ खाद्यविक्रेत्यांमध्ये ८५ विक्रेते स्विगी, ५० विक्रेते झोमॅटो, ३ विक्रेते फुडपांडा आणि दोन विक्रेते उबरइटशी संलग्न असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.