मुंबई : रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून ५९ वर्षांच्या महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

तक्रारदार महिला पती आणि दोन मुलांसोबत अंधेरीतील तेलीगल्ली परिसरात राहतात. २३ जानेवारी २०२३ रोजी त्या कुटुंबियांसोबत बंगळुरू येथे फिरायला गेल्या होत्या. ते सर्वजण ३ फेब्रुवारीला मुंबईत आले. त्यानंतर सात दिवसांनी म्हणजेच शुक्रवार, १० फेब्रुवारीला त्यांच्या पतीच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंटसंदर्भात एक लिंक आली होती. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती दिली होती. माहिती दिल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून काही ऑनलाइन व्यवहार झाले. या व्यवहारातून त्यांच्या कार्डवरून सुमारे दोन लाख रुपयांचे व्यवहार झाले होते.

india sebi advises regulators to supervise cryptocurrency trading
‘क्रिप्टो’ व्यवहारांवर नियंत्रणासाठी सेबी अनुकूल; रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेला छेद देणारा पवित्रा
Supreme Court, reforms,
यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..
bsnl to launch 4g services across india
बीएसएनएलच्या ४ जी सेवेला अखेर ऑगस्टचा मुहूर्त; पंजाबमधील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर देशभरात अनावरण
ICSE 2024 Results Declared in Marathi
ICSE 2024 Results Out: १० वी, १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी! कुठे व कसा पाहाल आयसीएसईचा निकाल?
Indegene IPO is open for investment from May 6 eco news
इंडेजीनचा ‘आयपीओ’ ६ मेपासून गुंतवणुकीस खुला
Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
supreme court
सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन; व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खटले, सूचीबद्ध प्रकरणांची माहिती
Maratha quota case update
मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलली, आतापर्यंत काय काय घडले?

हेही वाचा – राज्यात आर्थिक विकासासाठी पोषक वातावरण – एन. चंद्रशेखरन

हेही वाचा – ७१ कोटी रुपयांचा पथकर घोटाळा : चौकशीच्या मंजुरीचे काय झाले?

ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच या महिलेने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला दूरध्वनी करून पतीच्या क्रेडिट कार्डवरून होणारे व्यवहार बंद केले. त्यानंतर तिने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी क्रेडिटकार्ड कंपनीकडून व्यवहारांबाबत माहिती मागवली आहे. त्या आधारे तपास करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.