पवनहंस हेलिकॉप्टर अपघातातीत एका वैमानिकाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी खोल समुद्रात हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमध्ये सापडला आहे. हेलिकॉप्टरच्या इतर भागांचे अवशेष शोधण्याचे काम सुरू असून या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याचे नौदलाच्या वत्तीने सांगण्यात आले आहे. हे शोधकार्य मुंबईच्या तटरक्षक बचाव सुसूत्रता समितीमार्फत करण्यात आले.
गेल्या बुधवारी पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर दक्षिण मुंबईहून ८० सागरी मैलांवर समुद्रात कोसळले होते. यात हेलिकॉप्टरमधील दोन वैमानिक बेपत्ता झाले होते. यानंतर भारतीय नौदलाने शोधकार्यासाठी आयएनएस मुंबई ही विनाशिकाही मदतीसाठी वापरली. दरम्यान या हेलिकॉप्टरचा एक दरवाजा आढळून आला होता. त्यानुसार शोध घेण्यात आला. मात्र गेल्या सहा दिवसांच्या शोधकार्यानंतर सोमवारी हेलिकॉप्टरचे काही अवशेष मिळाल्याने एका वैमानिकाच्या मृतदेह सापडल्याचे नौदलाच्या वत्तीने सांगण्यात आले आहे.