बार आणि हॉटेल्सना विविध परवाने देण्याबाबतचे पोलिसांचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. याबाबतचे नवे नियम तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
बार आणि हॉटेलला यापूर्वी पोलिसांकडून खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र, जलतरण तलाव परवाना, मनोरंजनविषयक परवाना, लॉजिंगबाबतचा परवाना यासह पाच परवाने देण्यात येत होते. मात्र आता पोलिसांचे हे अधिकार राज्य सरकारने रद्द केले आहेत. बार आणि हॉटेलना परवाने देण्याबाबत नवीन नियमावली तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहे. याबाबतचे एक परिपत्रक राज्य सरकारने जारी केले असून ते सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.