विधानसभा परिसरात वाहतूक पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी नवी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. या पूर्वीही सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या आमदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी याचिका करण्यात आली आहे.
केतन तिरोडकर यांनी ही याचिका करून प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने त्यावरील सुनावणी २२ एप्रिल रोजी ठेवली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र अद्याप या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले नसल्याने तपास ‘जैसे थे’च असल्याचे तिरोडकर यांनी न्यायालयाला सांगत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer beatan by mla demand for cbi enqury
First published on: 09-04-2013 at 04:07 IST