scorecardresearch

Premium

नारायण साईच्या आश्रमावर पोलिसांचा छापा

नारायण साईचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी रात्री विरार पोलिसांनी शिरगाव येथील नारायण साईच्या आश्रमावर छापा टाकला.

नारायण साईच्या आश्रमावर पोलिसांचा छापा

नारायण साईचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी रात्री विरार पोलिसांनी शिरगाव येथील नारायण साईच्या आश्रमावर छापा टाकला. मात्र या आश्रमात नारायण साई सापडला नाही. गुजरात पोलीस गेल्या वीस दिवसांपासून देशभरात नारायण साईचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.
विरारमधील कुंभार पाडा या गावातील आश्रमात नारायण साई नेहमी येत असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नारायण साई या आश्रमात लपून बसल्याचा संशय गुजरात पोलिसांना होता. या माहितीच्या आधारे गुजरात पोलीस आणि विरार पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मात्र आश्रमात कर्मचा-यांव्यतिरीक्त अन्य कोणीही आढळून आले नाही.
नारायण साईविरोधात सुरतच्या दोन बहिणींनी बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून गुजरात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police raid on narayan sai ashram in virar

First published on: 26-10-2013 at 10:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×