‘कॅनन’ आणि ‘एचपी’ या प्रख्यात कंपन्यांची बनावट उत्पादने विकणाऱ्या दुकानांवर छापा घालून पोलिसांनी जप्त केली. फोर्ट आणि अंधेरी येथे हे छापे घालण्यात आले.या छाप्यात एकूण २५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
कॅनन आणि एचपी या कंपन्या प्रिंटर्स आणि झेरॉक्स मशीनला लागणारे साहित्य बनवतात. या कंपन्यांच्या नावाने बनावट टोनर्स आणि इतर साहित्य विकले जात असल्याची माहिती ईआयपीआर कंपनीला मिळाली होती. त्यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने फोर्ट आणि अंधेरीच्या धोबी तलाव येथे तीन ठिकाणी छापे घालून सुमारे २५ लाखांचा ऐवज जप्त केला. फोर्ट येथील कारवाईत ११ लाख आणि अंधेरी येथील कारवाईत १४ लाखांचा बनावट साहित्य जप्त करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये लालजी पटेल, भावेश कमानिया, कानजी कमानिया आणि रमेश शुक्ला या दुकान मालकांसह त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना समावेश आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग आणि अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली.