जम्मू काश्मीरमधून बेकायदा शस्त्रे घेऊन मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडील परवान्यांची चौकशी करण्यासाठी मालमत्ता विभागाचे एक पथक जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्हयात रवाना झाले आहे.
 जम्मू काश्मीरमधील काही जण मुंबईत शस्त्रांसह वास्तव्य करीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाला मिळाली होती. पोलिसांनी  वांद्रे येथील राजीव नगर झोपडपट्टीत छापा घालून २१ जणांना अटक करण्यात आली. हे सर्व जण ‘मॉर्डन व्ही आर सिक्युरिटी फोर्स’ या सुरक्षा एजन्सीत कामाला होते. त्यांच्याकडे २१ रायफली आणि १९३ जिवंत काडतुसे सापडली होती. ही शस्त्रे बाळगण्याची कुठलीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. जम्मू काश्मीरचा परवाना आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. या परवान्यांची तपासणी करण्यासाठी आमचे एक पथक पुंछ जिल्हयात रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशीसाठी  सुरक्षा एजन्सीच्या मालकांना आम्ही चौकशीसाठी बोलावले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी  वांद्रे येथील राजीव नगर झोपडपट्टीत छापा घालून २१ जणांना अटक करण्यात आली. हे सर्व जण ‘मॉर्डन व्ही आर सिक्युरिटी फोर्स’ या सुरक्षा एजन्सीत कामाला होते. त्यांच्याकडे २१ रायफली आणि १९३ जिवंत काडतुसे सापडली होती. ही शस्त्रे बाळगण्याची कुठलीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती.