काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात राज्यातील कुंडलिक माने यांना हौतात्म्य आले. त्याचे गांभीर्य विसरून राज्यातील नेतेमंडळींनी यावर राजकारण करत बालिशपणाचे दर्शन घडविल़े भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ओरड सुरू केली. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात माने हे शहीद झाले, असे विधान मुंडे यांनी केले. याच मुद्दय़ावर भाजपने दोन दिवस संसदेचे कामकाज बंद पाडले होते. यामुळे मुंडे आणि भाजपने माफी मागावी, अशी मागणी मलिक यांनी केली.