उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशातील ८७५ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यात महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील ५७ पोलिसांना विविध गटातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात १२ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार, ४१ पोलिसांना उत्कृष सेवा दिल्याबद्दल तसेच ४ पोलिसांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे (सुरक्षा) अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (पश्चिम विभाग) अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन (आर्थिक गुन्हे शाखा) पोलीस आयुक्त तानाजी घाडगे, पोलीस उपायुक्त दत्ता कराळे यांचा समावेश आहे.