शासकीय दौऱ्यावरून वाद निर्माण झाल्यानेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपला अमेरिका दौरा अखेर रद्द केला. मुख्यमंत्री कार्यालयाने विखे-पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात सहभागी होणार, असे प्रसिद्ध केले होते. एकीकडे काँग्रेसने भाजपच्या विरोधात आघाडी उघडली असताना विरोधी नेत्याने शासकीय खर्चाने अमेरिका दौरा करणे योग्य ठरणार नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसच्या वतीनेही शक्यतो दौरा टाळावा, असा सल्ला देण्यात आला. यामुळे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरिता अमेरिका दौरा विखे-पाटील यांनी रद्द केला आहे.