राज ठाकरे – चंद्रकांत पाटील आज भेट

भाजप-मनसे युतीची चर्चा गेले काही दिवस होत असून पाटील व राज ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुœवार सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी सांगितले असले तरी भाजप-मनसे युतीची चर्चा या भेटीत होणार आहे.

भाजप-मनसे युतीची चर्चा गेले काही दिवस होत असून पाटील व राज ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackeray meets chandrakant patil mns bjp akp