मुंबई : दिवंगत ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव गडकरी यांच्या विलेपार्ले येथील स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत या स्मारकाची दुरवस्था झाली होती. विलेपार्ले येथील एका सांस्कृतिक संस्थेने पालिकेचे लक्ष वेधले होते.

विलेपार्ले येथे एका चौकाला माधव गडकरी यांचे नाव देण्यात आले आहे. येथे गडकरी यांचे स्मारकही उभारण्यात आले आहे. तीन पुस्तके, त्यावर एक दौत आणि त्यात पक्ष्याच्या पिसाची लेखणी असे या स्मारकाचे स्वरूप आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्मारकाची दुरवस्था झाली होती. येथील लेखणी आणि नामफलक नाहीसा झाला होता. दौतीचा रंग उडाला होता. या स्मारकाला पूर्वरूप प्राप्त व्हावे यासाठी पार्ले पंचम या संस्थेने पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर पालिकेने या स्मारकाचे काम हाती घेतले. काही दिवसांपूर्वीच या स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून आता तेथे पुन्हा दौत व लेखणी दिसू लागली आहे. दौतावर नामफलकही लावण्यात आला आहे.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?