क्रांतीकारक राघो गाडे यांचे निधन

अंबरनाथ तालुक्यातील भाई सावरे गावी राहणारे राघो शंकर गाडे यांचे गुरूवारी वयाच्या ११३ वर्षी निधन झाले.

अंबरनाथ तालुक्यातील भाई सावरे गावी राहणारे राघो शंकर गाडे यांचे गुरूवारी वयाच्या ११३ वर्षी  निधन झाले.  त्यांच्या पश्चात शिवाजी, सुधाकर, रमेश व मंगल हे चार पुत्र, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
गाडे हे भाई कोतवाल यांच्या ‘आझाद हिंद दस्ता’ संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. या संघटनेने अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ, माथेरान येथील तरूणांना सोबत घेऊन इंग्रजांविरोधात लढा दिला.  इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी गाडे यांना ‘ताम्रपट’ दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Revolutionary activist raghu gade dies

ताज्या बातम्या