लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका तरूणाला तीन तृतीय पंथींनी मारहाण करून त्याच्याकडील ४० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार कापुरबावडी भागात सोमवारी रात्री घडला असून या प्रकरणी पोलिसांनी एका तृतीय पंथीस अटक केली आहे. तसेच त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
पायल सुरेश दुबे (२५), असे अटक करण्यात आलेल्या तृतीय पंथीचे नाव असून तो वर्तकनगर भागात राहतो. डोंबिवली पुर्व भागात राहणारे दिलीपकुमार आत्माराम उपाध्याय (३२) हे काही कामानिमित्त सोमवारी ठाण्यात आले होते. दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील कापुरबावडी येथील लोढा कॉम्पलेक्स परिसरात ते लघुशंका करण्यासाठी गेले. त्यावेळी पायल आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडील ४० हजार रुपयांची रोकड लुटली. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबेला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी त्याचे दोघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्या दोघांचाही शोध सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of money by biting the one young
First published on: 13-02-2013 at 03:46 IST