scorecardresearch

Premium

संध्या सिंग हत्या प्रकरण : श्रेयाची पॉलिग्राफ चाचणी सुरू

नवी मुंबईतील संध्या सिंग हत्या प्रकरणी संशयित रघुवीर सिंग याची प्रेयसी श्रेयाची पॉलिग्राफ चाचणी मंगळवारी सुरू झाली.

नवी मुंबईतील संध्या सिंग हत्या प्रकरणी संशयित रघुवीर सिंग याची प्रेयसी श्रेयाची पॉलिग्राफ चाचणी मंगळवारी सुरू झाली. अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही चाचणी सुरू झाली असून ती शनिवारी पूर्ण होणार आहे.
श्रेया ही संध्या सिंग यांचा मुलगा रघुवीर याची प्रेयसी आहे. याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संध्या सिंग हत्या प्रकरणातील ही पहिली पॉलिग्राफ चाचणी आहे. मुंबईत आवश्यक त्या सुविधा नसल्याने ती अहमदाबाद येथे घेण्यात आली. पोलिसांनी ही चाचणी घेणाऱ्या तज्ज्ञांना प्रश्नावली दिली असून शनिवारीपर्यंत ही चाचणी पूर्ण होईल, असे पोलिसांनी सांगितले. श्रेयाची ब्रेन मॅपिंग चाचणीही केली जाणार आहे.
 संध्या सिंग (५०) या प्रख्यात संगीतकार जतीन ललित यांच्या बहिण होत. १२ डिसेंबर २०१२ रोजी त्या बॅंकेत दागिने ठेवण्यासाठी गेल्या होत्या तेव्हापासून बेपत्ता होत्या. २६ जानेवारी २०१३ रोजी नेरूळ खाडीजवळ त्यांच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sandhya singh murder case narco test on sons friend begins

First published on: 21-08-2013 at 02:01 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×