scorecardresearch

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण; संजय राऊत म्हणाले, “शिवसेना ही…”

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

sanjay raut reaction on devendra fadnavis
संग्रहित फोटो-एएनआय वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. याप्रकरणी आता युक्तिवाद पूर्ण झाला असून हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – “औरंगाबादचं नामांतर करण्याची हिंमत भाजपात नाही”; संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “ढोंगी लोक…”

काय म्हणाले संजय राऊत?

”सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अजूनही या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदसदविवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत. म्हणून न्यायालय जिवंत आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. हेच या महाराष्ट्राचं सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण, आता निकालाकडे सर्वांचे लक्ष; अनिल परब म्हणाले “…तर भविष्यात अडचणी येणार”

”शिवसेना कोणती खरी आणि कोणती खोटी हे जनता ठरवेल. उद्या न्यायालयाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे निर्देश तरी आमची तयारी आहे. हा निकाल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि हा निकाल देशासाठी दिशादर्शक ठरावा हीच आमची भूमिका आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटाचे नेते वारंवार सांगतात की निकाल आमच्याच बाजुने लागेल. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्या स्पष्ट सांगितलं की निकाल आपल्या बाजुने लागेल. याच्यात हा आत्मविश्वास येतो कुठून? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 15:39 IST
ताज्या बातम्या