मुंबईतल्या डोंगरी भागात कौसरबाग ही इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली ४५ ते ५० जण अडकल्याची भीती आहे. मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून एका बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दल आण एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली जी माणसं अडकली आहेत त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. एका बाळाला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. या संदर्भातला व्हिडिओही
समोर आला आहे.

पाहा व्हिडिओ

 

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली त्यानंतर तातडीने अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४५ ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे.

स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.