ठाण्यातील शिळफाटा भागातील सात मजली इमारत दुर्घटनेला तब्बल १५ महिने उलटल्यानंतर पोलिसांनी मुख्य कंत्राटदाराला लातूर येथे अटक केली आहे. लक्ष्मण राठोड असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटदाराचे नाव असून, याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता २५च्या वर पोहचली आहे, असे ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक  संजीव कदम यांनी आज सांगितले.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ठाण्यातील सात मजली इमारत कोसळून त्याखाली ७८ लोक मृत्युमुखी, तर ६२ लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ठाणे शहरच्या डाकघर पोलिसांनी इमारतीच्या जागा विकसकासह इतरांवर गुन्हे दाखल केले होते.