शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे.

विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.

mumbai heatwave alert marathi news,
मुंबईत रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा; ठाणे, रायगड जिल्ह्यात आज, उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
The election commission rejected the Thackeray group reconsideration petition regarding the campaign song
‘जय भवानी’वरील बंदी कायम; प्रचारगीताबाबत ठाकरे गटाची फेरविचार याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली
Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Vande Bharat, Tejas Express,
पावसाळ्यात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस धावणार

संजय राऊत यांच्या वतीने वकिलांनी आठ दिवसांची कोठडी देण्यास विरोध दर्शवला. राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला. ‘आर्थिक गुन्हे शाखेने २०२० मध्ये पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. असं असतानाही संजय राऊतांना आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती,’ असं निदर्शनास आणून दिलं.

संजय राऊतांना रात्री १२.३० वाजता अटक करत स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आल्याचं यावेळी संजय राऊतांच्या वकिलांनी सांगितलं. तसंच संजय राऊतांना ह्रदयाचा त्रास असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर ईडीने औषधं आणि घरचं जेवण देण्यास आपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं.

संजय राऊतांची रात्रीच्या वेळी चौकशी केली जाऊ नये अशीही विनंतीही करण्यात आली. यावर ईडीने सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात असं सांगितलं. तसंच रात्री १०.३० नंतर त्यांची चौकशी न करण्याची हमी दिली. यानंतर कोर्टाने निकाल वाचन करताना संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. संजय राऊतांना आठ दिवसांची कोठडी देण्याची गरज नसून चौकशीसाठी इतकी पुरेशी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.