मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची भरती करताना १५ सेवाजेष्ठ चतुर्थश्रेणी कामगारांवर अन्याय करण्यात आला. मात्र आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी म्युनिसिपल मजदूर युनियनने न्याय मिळेपर्यंत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाची दाखल घेत महानगरपालिका प्रशासनाने चर्चेसाठी पुढाकार घेतला आणि दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

हेही वाचा >>> मुंबईः वृद्ध दाम्पत्यावर नोकराचा हल्ला,७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पत्नी जखमी

Collector opened Kasturchand Park after petition was filed in the court
नागपूर : न्यायालयात याचिका दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी उघडले कस्तुरचंद पार्क…
Kolhapur, Bidri Sugar Factory, Bidri Sugar Factory s president, k p patil , Court Ordered, Audit, Kolhapur news, marathi news
के. पी. पाटील यांनी आव्हान स्वीकारले; बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षण आदेशाचे स्वागतच
Nagpur, Auto, Auto rickshaw drivers association,
नागपूर : ‘त्या’ ऑटो चालकाविरुद्ध ऑटोरिक्षा चालक संघटना सरसावली
various development organizations is the real problem of nagpur city observation by nagpur bench of bombay hc
विविध विकास संस्था असणे हीच नागपूर शहराची खरी समस्या -उच्च न्यायालय म्हणाले…
farmers, loan waiver, Nagpur High Court,
शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Resident doctors, attacked,
दीड वर्षात निवासी डॉक्टरांवर नऊ वेळा हल्ले, सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी ‘मार्ड’चे राज्य सरकारला पत्र
mumbai, Bhabha Hospital, Nurse Assaulted, Nurse Assaulted at Bhabha Hospital, Nurses warns Strike, Nurses Safety Concerns, Bhabha Hospital nurses warns Strike, hospital news, Bhabha hospital news, nurse assaulted news,
मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची भरती करताना पात्र  ३८ सेवाजेष्ठ चतुर्थश्रेणी कामगारांची व्यवसाय चाचणी घेण्यात आली. यापैकी २३ कामगार उत्तीर्ण, तर १५ सेवाजेष्ठ कामगार अनुत्तीर्ण झाले. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या कामगारांना व्यवसाय चाचणीत अनुत्तीर्ण करण्यात अले असून सेवाजेष्ठ कामगारांना डावलण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत होता. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अन्याय झालेल्या कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : दारूच्या नशेत वारंवार बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या सराईत आरोपीला अटक

यासंदर्भात म्युनिसिपल मजदूर युनियनने शीव रुग्णालयाच्या अधिष्ठातासह महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून व्यथा मांडली होती. मात्र  आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडले नाही. यामुळे म्युनिसिपल मजदूर युनियनने कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सोमवारी उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाची महानगरपालिका उपायुक्त संजय कुऱ्हाडे आणि वैद्यकिय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दाखल घेऊन म्युनिसिपल मजदूर युनियनचे पदाधिकारी आणि संबंधित कामगारांसोबत चर्चा केली. यावेळी चार सदस्य समिती स्थापन  करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे मुंबईचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.