सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाची शैक्षणिक केंद्राच्या परिसरातील विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी असली तरी त्याची अंमलबजावणी किती होते हे सामान्य मुंबईकरांना ठाऊक आहे. मात्र सामान्यांना जे दिसते ते कारवाई करणाऱ्या यंत्रणांच्या जाळ्यात मात्र येत नाही, हा अनुभव पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासना(एफडीए)च्या कारवाईत अनुभवायला येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने १८ व १९ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत मुंबईत सार्वजनिक धूम्रपान करणारे केवळ ९५ जण तर १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणारे केवळ चौघे सापडले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्टीकरण एफडीए देत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असली तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य उत्पादने विकण्यास सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ नुसार मनाई करण्यात आली असली तरी आजही सर्रासपणे कायदा धाब्यावर बसवला जातो. शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना लहान वयात तंबाखूचे व्यसन लागते. याविरोधात राज्यभरात कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिले आहेत. त्यानुसार १८ जानेवारीपासून कारवाई सुरू झाली असली तरी ती प्रभावी मात्र ठरलेली नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही कारवाई अत्यंत संथ पद्धतीने सुरू आहे. या कारवाईत राज्यभरातील १३२७ जणांवर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असली तरी इतर शहरांच्या तुलनेत मुंबईसारख्या मोठय़ा शहरात दोन दिवसांत केवळ ९५ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे. त्यामानाने ठाण्यात तब्बल ५०४ सार्वजनिक धूम्रपानबहाद्दरांवर कारवाई करण्यात यश आले आहे. पुणेदेखील मुंबईच्या तुलनेत कारवाईत पुढे आहे. हीच गत लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्याबाबत आहे. मुंबईतील केवळ चारजणांवर कारवाई करण्यात आली असतानाच नागपूरमध्ये मात्र २४ जण विद्यर्थ्यांना विक्री करताना आढळले. मोठय़ा शहरांपेक्षा लहान शहरांमध्ये ही कारवाई अधिक प्रभावी झाल्याचे दिसत असून एकटय़ा लातूरमध्ये दोन दिवसांत ४५ विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली. अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आदी ठिकाणीही ११० विक्रेत्यांवर कारवाई झाली. त्यामानाने मुंबईत चार तर ठाण्यात अवघ्या १५ जणांवर कारवाई झाली. अन्न व औषध प्रशासनात अपुरे निरीक्षक असल्याने शहरभरात एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही. तरीही असलेल्या मनुष्यबळातून ही कारवाई सुरू असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई २२ जानेवारीपर्यंतच सुरू राहणार आहे.

Untitled-1

control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट

बंदी कुठे..
सिगारेट फुंकणाऱ्यापेक्षा तो वास श्वसावाटे शरीरात घेणाऱ्याला तीनपट अधिक धोका असतो. त्यामुळे रेल्वेस्थानके, बसथांबे, बाजारासारखे गर्दीचे परिसर आदी ठिकाणी धुम्रपानाला बंदी घालण्यात आली आहे.