मुंबई : मध्य रेल्वेने आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमळी दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०४३ विशेष रेल्वेगाडी एलटीटीवरून १ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे २ मार्च रोजी सकाळी १० वाजता पोहोचले. गाडी क्रमांक ०१०४४ विशेष रेल्वेगाडी करमळी येथून ३ मार्च रोजी दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे मध्यरात्री ३.४५ वाजता पोहचेल.

आणखी वाचा-गृह प्रकल्प वेळेत पूर्ण न करणारे विकासक, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश

या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल. या रेल्वेगाडी संरचना २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅनसह ४ द्वितीय श्रेणी आणि १ जनरेटर कार अशी असेल. २६ फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह विशेष रेल्वेगाडीचे आरक्षण करता येईल.