मुंबईमध्ये डेंग्यूपाठोपाठ आता हिवतापाच्याही साथीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून अनेक नागरिक हिवतापाने आजारी पडत आहेत. त्यामुळे सूर्यास्तानंतरही धूरफवारणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका संजना मुणगेकर यांनी केली आहे.
दिवसा चावणाऱ्या डासांमुळे डेंग्यू होत असून या डासांचा नायनाट करण्यासाठी दिवसभर विविध भागांमध्ये धूरफवारणी करण्यात येत आहे. रात्री चावणाऱ्या डासांमुळे हिवताप होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संध्याकाळी धूरफवारणी होत नसल्याने या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी सूर्यास्तानंतरही पालिकेमार्फत धूरफवारणी करावी, अशी मागणी  मुणगेकर यांनी केली आहे. पालिका सभागृहाच्या होणाऱ्या बैठकीत ठरावाच्या सूचनेद्वारे त्या ही मागणी करणार आहेत.