शेअर बाजारातील तेजीच्या भवितव्याचा वेध 

uddhav thackeray s had plan to arrest bjp leaders says eknath shinde
भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Suicide, Agripada, building, आत्महत्या,
आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
Bank fraud, forged documents,
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक, लाखोंचे वाहन कर्ज घेणाऱ्या तिघांना अटक
Gokhale Bridge, Barfiwala Bridge,
गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील नियोजनाचा अभाव का? अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती

मुंबई : आर्थिक घडामोडींवर करोनाच्या अनिश्चिततेचे ढग दाटले असताना, गेल्या दोन वर्षात शेअर बाजारात अनुभवता आलेल्या अभूतपूर्व तेजीच्या लाटा गुंतवणूकदारांना निश्चितच सुखावणाऱ्या ठरल्या. अलिकडच्या दिवसांत बाजारातील धडकी भरवणाऱ्या उलथापालथीने अनेकांना आता पुढे काय, असा प्रश्न पडला असेल. याच प्रश्नाची उकल येत्या रविवारी सकाळी ‘लोकसत्ता अर्थभान’ या कार्यक्रमातून केली जाणार आहे. 

लोभस परतावा आणि सुरक्षितता असे दुहेरी सुख देऊन, गुंतवणुकीचा गुणाकार साधणाऱ्या शेअर बाजार गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रम, रविवार, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता दूरचित्रसंवाद माध्यमातून होत आहे. शेअर गुंतवणुकीचे विश्लेषक आणि स्तंभलेखक अजय र्वांळबे हे कार्यक्रमाचे मुख्य वक्ते असून, ते गुंतवणूकदारांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकाचे निरसन करतील.

गेल्या दोन वर्षात भांडवली बाजारासाठी उपकारक ठरलेले घटक कोणते आणि जगाच्या सध्या सुरू असलेल्या वाटचालीच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार यांचा उहापोह या निमित्ताने वाळिंबे करतील. थेट शेअर बाजारात गुंतवणुकीऐवजी, म्युच्युअल फंडामार्फत समभागसंलग्न (इक्विटी) फंडातील गुंतवणुकीचे महत्त्व आणि मर्म तसेच त्या गुंतवणुकीचे करबचतीसाठी होणारी मदत याचीही ते  मांडणी करतील. दोन वर्षात दुपटीने वाढ झालेले डिमॅट खातेधारक अर्थात बाजारात नव्याने दाखल झालेले नवगुंतवणूकदार, प्रारंभिक समभाग विक्री म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून झालेली विक्रमी निधी उभारणी आणि गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद हे पाहता, सरलेले २०२१ साल हे भांडवली बाजारासाठी संस्मरणीय ठरले. विद्यमान २०२२ सालातील बाजाराच्या वाटचालीविषयी जाणून घ्यायचे तर रविवारच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांच्या उपस्थिती ही अत्यावश्यकच ठरेल.

मार्गदर्शक

’अजय वाळिंबे :

शेअर गुंतवणूक विश्लेषक

’कधी? रविवार, ६ फेब्रुवारी

’वेळ : सकाळी ११ वाजता

सहभागासाठी…

http:// tiny. cc/ LS_ Arthabhan_6 Feb  या लिंकवर जाऊन नोंदणी करा़  नोंदणीनंतर तुम्हाला ई-मेलवर एक संदेश येईल़  त्याद्वारे ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमात सहभागी होता येईल़

प्रस्तुत : आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड