मुंबई : गेल्या दोन वर्षांत करोना महासाथीने ग्रासलेल्या परिस्थितीतही राज्यातील कानाकोपऱ्यांत तरुण-तरुणींचा ताफा आपापल्या परीने समाजोपयोगी कामांत स्वत:ला झोकून देत होता. औषधनिर्मितीमधील संशोधनापासून ते करोनाबाधितांना रुग्णालयात खाटा मिळवून देण्यासाठीची व्यवस्था उभारण्यापर्यंत शहरगावांत असे कितीतरी तरुण स्वप्रेरणेने काम करीत होते.  या कार्यरतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या चौथ्या पर्वासाठी निवडप्रक्रियेला वेग आला असून ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

गगनालाही गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून जिद्दीने, सातत्याने नवनवीन कल्पना – तंत्रज्ञान – संशोधनाच्या आधारे विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचे नवे क्षितिज गाठणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. ‘भविष्यानेही आशेने पहावे, अशा वर्तमानाचा गौरव’ या घोषवाक्यासह सुरू झालेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे हे चौथे वर्ष आहे. करोनामुळे तिसऱ्या वर्षीचा पुरस्कार सोहळा लांबला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यात हा सोहळा पार पडला. तीन वर्षांत विविध क्षेत्रांतील ४६ कर्तृत्ववान तरुण तेजांकितांचा सन्मान या पुरस्कारांच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने केला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, क्रीडा, उद्योग आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत कर्तृत्वाची नवी क्षितिजे गाठणाऱ्या तरुणाईला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती

प्रायोजक

देशाचे भविष्य घडवू पाहणाऱ्या वर्तमानातील तरुण शिलेदारांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हे मुख्य प्रायोजक लाभले आहेत. तर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे या पुरस्कारांसाठी सहप्रायोजक आहेत.

प्रवेशिका ऑनलाइन

यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून  नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची जोड देत भरीव कार्य उभारणाऱ्या तरुणाईचा शोध घेण्यासाठी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचा हा मंच सज्ज झाला आहे.

प्रवेश अर्ज कसा भराल https:// taruntejankit.loksatta. com   येथे अर्ज उपलब्ध होतील. त्याचबरोबर आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवण्याचीही मुभा आहे.